खेडदिगरला मिरवणुकीत पारंपरिक नृत्य सादरीकरण ।

खेडदिगर येथील मिरवणुकीत भगवान बिरसा मुंडा यांच्या सजीव देखाव्यासोबत आ.राजेश पाडवी, मकरंद पाडवी आदी.

खेडदिगर। ( प्रधान संपादक रविन्द्र सोनिस ) शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात जिल्हाभरातील हजारो युवक सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहादा-तळोदा मतदार संघांचे आमदार राजेश पाडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी आदिवासी समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. त्यांनी पारंपरिक नृत्याचे सादरीकरण केले. परिसरात प्रसिद्ध असलेला रॉकी स्टार बँडची सर्वांना भुरळ पडली होती. त्यामुळे विशेषतः युवक या बँडच्या तालावरनृत्यासाठी मोठी गर्दी करत होते. येथील आदिवासी युवक हे दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस उत्साहाने साजरा करत गावभर मिरवणूक काढतात. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी खेडदिगरचे लोकनियुक्त सरपंच गणेश कोळी, उपसरपंच शिवराज बर्डे, मंजुळा मुसळदे, प्रवीण ठाकरे, प्रदीप मुसळदे (लल्ला), हरिहर माळी, खुशाल मुसळदे, मगन शेमबडे, इंद्रा मुसळदे. सुनील पवार, दीपक वाघ, आकाश मुसळदे, सुभाष माळी तसेच जिल्हाभरातील सरपंच व युवक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी म्हसावद पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!